मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसच्या मुख्य ट्विटर अकाऊंटसह ५ बड्या काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आली आहेत. काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचे मागील आठवड्यात ट्विटर अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले होते. यानंतर काँग्रेसचं डिजिटल आईएनसी चॅनलच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्यात आली होती. राज्यातील महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं देखील ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे.
राहुल गांधीच्या ट्विटला समर्थन केल्यामुळे माझ्या अकाऊंटलाही लॉक करण्यात आलं आहे. हा सगळा प्रकार लोकशाहिच्या विरोधात आहे. विचार स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. या अधिकाराला अबाधित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. ट्विटरनं अकाऊंटल लॉक केले यामध्ये ट्विटरचा दोष आहेच मात्र यापेक्षा जास्त दोष भाजप आणि केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकार ट्विटरवर अकाऊंट लॉक करण्यासाठी दबाव आणत आहे, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
नागरिकांच्या विचारांची गळचेपी करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. ट्विटर ही आंतररष्ट्रीय कंपनी असूनही भाजपच्या दाबवाखाली काम करत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही आमचा लढा सुरुच ठेऊ, हम लढेंगे, असा आक्रमक पवित्रा बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ट्विटर अकाऊंटवर कारवाई करुन लॉक करण्यात आलं आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भूमिकेला बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला आहे. पाठिंबा दर्शवत थोरात यांनी ‘मै भी राहुल’ असे ट्विट केले होते. राहुल गांधी यांनी नियमांचे उल्लंघन करणारा फोटो पोस्ट केल्यामुळे ट्विटरनं कारवाई केली आहे. त्याच फोटोवर थोरात यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे.
Previous Articleसातारा : लोखंडी प्लेटांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
Next Article ‘सरकार’ आहे की, ‘सर्कस’? : प्रविण दरेकर









