दोन सत्रांमध्ये होणार परीक्षा : 23 डिसेंबरपर्यंत आयोजन : कोरोनामुळे परीक्षांना विलंब
प्रतिनिधी /बेळगाव
अकरावी व बारावीच्या सहामाही परीक्षांना गुरुवार दि. 9 पासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रातील पेपर सकाळी 9.30 ते दुपारी 12.45 यावेळेत होणार आहेत. दुपारच्या सत्रातील पेपर दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 यावेळेत घेतले जाणार असल्याचे परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकात म्हटले आहे.
दि. 9 ते 29 डिसेंबरदरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेदरम्यान केपीएससीची परीक्षा असल्याने त्यावेळी बारावीचे पेपर होणार नाहीत. यावषी कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाले. याचा परिणाम अभ्यासक्रमावर झाला. त्यामुळे परीक्षांसाठीही विलंब झाला
आहे.
परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
| तारीख | सकाळचे सत्र | दुपारचे सत्र |
| 09/12/2021 | इतिहास, फिजिक्स (भौतिकशास्त्र) | – |
| 10/12/21 | कन्नड | मराठी |
| 11/12/21 | इकॉनॉमिक्स (अर्थशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र) | – |
| 15-12-21 | – | स्टॅटेस्टिक्स (संख्याशास्त्र) |
| 16-12-21 | सोशॉलॉजी (समाजशास्त्र), मॅथॅमेटिक्स (गणित) | बेसिक मॅथ्स् (मूळ गणित) |
| 17-12-21 | हिंदी | उर्दू , संस्कृत |
| 18-12-21 | इंग्रजी | – |
| 20-12-21 | पॉलिटीकल सायन्स (राज्यशास्त्र), बायोलॉजी (जीवशास्त्र), जियोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स | म्युझिक |
| 21-12-21 | अकौंटन्सी, एज्युकेशन, होम सायन्स | – |
| 22-12-21 | लॉजिक, बेसिक स्टडीज | – |
| 23-12-21 | जिओग्राफी, मानसशास्त्र | आयटी, रिटेल, ऑटोमोबाईल, हेल्थ केअर, ब्युटी ऍण्ड वेलनेस |









