हिंदू आणि पारसी वास्तुकलेचा संगम तसेच अत्यंत सुंदर आणि लाल रंगाच्या दगडांनी निर्मित फतेहपूर सिकरीमध्ये स्मारक संरक्षणाठी उत्खनन कार्य सुरू आहे. या उत्खनन कार्यात 16 व्या शतकातील कारंजा आढळून आला आहे. हा कारंजा सँड स्टोन आणि लाइम स्टोनने तयार करण्यात आला होता. मुगलकाळातील नक्षीकाम या कारंज्यावरही दिसून आले आहे. या कारंज्याची लांबी 8.7 मीटर असून त्याखाली 1.1 मीटर खोल टँकही आहे.
वातावरण थंड ठेवण्यासाठी हा कारंजा तयार करण्यात आला असावा. याचा जलस्रोत कोणता होता याचा शोध आता पुरातत्व विभागाचे अधिकारी घेत आहेत. हा कारंजा मुगलसम्राट अकबरचा सहकारी तोडरमलच्या महालासमोर आढळला आहे. तोडरमल अकबरच्या नवरत्नांपैकी एक होता. ते अकबरचे महसूल तसेच अर्थमंत्री होते.









