प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज एमआयडीसी परिसरातील 2 किलो 336 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ विक्री केल्या प्रकरणी चौघांवर कारवाई केली.एकूण 62 हजारचा माल जप्त केला असून ईराप्पा रामा बागेवाडी (वय 21, रा. गणेशनगर निपाणी), मोईन जुबेर बागवान (वय 18, रा. खरी कॉर्नर निपाणी), प्रदिप प्रभाकर मुगळे (वय 19, रा. अब्बलदरी रोड निपाणी) आणि गणेश परशूराम कांबळे ( वय 25, रा. आमरोळी ता. चंदगड ) या चौघा संशयितांना गडहिंग्लज पोलीसांनी अटक केली आहे.
गुरूवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज एमआयडीसी मार्गावर ही कारवाई केली. ईराप्पा रामा बागेवाडी हा आपल्या दुचाकीवरून मोईन जुबेर बागवान, प्रदिप प्रभाकर मुगळे या दोघांना घेवून गांजा सदृश्य अंमली पदार्थ देण्यासाठी आले होते. त्यांनी हा पदार्थ गणेश कांबळे यास बेकादेशीर विक्री करत असता धाड टाकून ही कारवाई करण्यात आली.
यात 30 हजार किंमतींचे हिरवट पाने, फुले, काडया, बिया असा उग्रदर्प असलेला ओलसर गांजा सदृश्य अंमली पदार्थ आणि चौघाकडील दुचाकी, मोबाईल पोलीसांनी जप्त केले आहेत. याबाबत हवालदार मारूती ठिकारे यांनी गडहिंग्लज पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. अंमली पदार्थ कायद्यान्वे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड हे करत आहेत.









