नवी दिल्ली
अंबुजा सिमेंट्सचा चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर तिमाहीमध्ये निव्वळ नफा हा 10.85 टक्क्यांनी वधारुन 890.67 कोटी रुपयावर पोहोचला आहे. कंपनीचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबरपर्यंत असते. यामध्ये मागील आर्थिक वर्षातील समान तिमीत कंपनीने 803.50 कोटी रुपयाची निव्वळ कमाई केली होती. तिमाहीच्या दरम्यान 7.74 टक्के उत्पन्न वाढून 6,647.13 कोटीवर पोहोचले आहे.









