प्रतिनिधी/कोल्हापूर
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे रविवारी रात्री 11 वाजता ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता ते अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. साडेसात वाजता ते जोतिबा मंदिराकडे प्रयाण करणार आहेत. आठ वाजता जोतिबा देवाचे दर्शन घेणार असून, साडेनऊ वाजता नरसोबावाडी येथे दत्तदर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते साडेदहा वाजता चिकोडी, बेळगावमार्गे गोव्याला जाणार आहेत.