वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
रिलायन्स इंडस्ट्रीज ओव्हरसीज सिंडिकेट कर्जाच्या मार्गावरुन प्रवास करत आपल्या दूरसंचार आणि पेट्रोलियम व्यवसायत फंड उभा करण्याची योजना कंपनी तयार करत आहे. यासाठी रिलायन्स तब्बल दोन अब्ज डॉलर(14,370 कोटी रुपये) जमा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मागील वर्षात रिलायन्सने भांडवल विस्तार करण्यासाठी 1.85 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज घेतले होते.
बाजारी मूल्यात सर्वोच्च असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आपले कर्ज कमी करण्यासाठी प्रमुख व्यापारामधील हिस्सेदारी विकण्याची घोषणा करण्याची शक्यता असून कंपनीने ऑईल आणि पेट्रोलियम व्यवसायातील 20 टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी सौदी अराम्कोसोबत चर्चा सुरु असल्याचेही पहावयास मिळत आहे.
फंड उभारण्याची तयारी
उपलब्ध माहितीनुसार संबंधीत फंड उभा करण्यासाठी रिलायन्स बारक्लेज, सिटीग्रुप, जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टेनली आणि एमयूएफजीसह विदेशातील बँकांसोबत कंपनी चर्चा करण्याची शक्यता आहे. सर्व मार्ग वापरुन येत्या फेब्रुरवारीपर्यंत हा फंड जमा करण्याचे संकेत आहेत.