प्रतिनिधी /बेळगाव
मुंबई येथील अंध सायकलपटू अजय ललवानी याने 7 हजार कि. मी. चा प्रवास करून भारत भ्रमंती केली आहे. या सायकलपटूचे नुकतेच बेळगावमध्ये आगमन झाले असून, त्याचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. अजय याच्या नावावर आतापर्यंत दोन जागतिक विक्रम आहेत.
अंध अजयने मुंबई-गोवा-मुंबई, दादर-गोंदिया-दादर असा सायकल प्रवास पूर्ण केल्यानंतर आता तो मुंबई येथून श्रीनगर व तेथून कन्याकुमारी व पुन्हा मुंबई असा प्रवास करणार आहे. कोल्हापूर मार्गे त्याचे बेळगावमध्ये आगमन झाले. इम्रान तोरगल व भरत पुरोहित यांनी त्यांची बेळगावमध्ये व्यवस्था केली. अजय सोबत 18 जणांची टीम कार्यरत असून, रस्ता सुरक्षा व रस्त्यांवर पुरेशा प्रकाशाची गरज यासाठी ते जागृती करत आहेत.









