ऑनलाईन टीम / मोहाली :
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पंजाबमधील दुकानदारांनी नव्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे. पंजाबमधील मोहाली येथे काही दुकानदारांनी दुकानांवर आणि दुकानात ‘अंधभक्तांना येथे येण्यास मनाई आहे’ असे पोस्टर्स लावले आहेत.
मोहालीमधील केवळ किरकोळ दुकानातच नव्हे तर मोठमोठ्या स्टोअर्समध्येही अशा प्रकारचे बोर्ड पहायला मिळतात. या दुकानदारांचे म्हणणे आहे की, आम्ही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत आहे. भले त्यासाठी आम्हाला नुकसान सहन करावे लागले तरी चालेल. पण अंधभक्तांनी आमच्या दुकानांमध्ये येऊ नये.









