इंफाळ / वृत्तसंस्था
अंदमान-निकोबार बेटांसह मणिपूरमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मणिपूरमध्ये भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. तर अंदमान निकोबारमध्ये याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी 7.48 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, सायंकाळपर्यंत कोठेही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तरीही सकाळच्या सुमारास झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.









