प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई विद्यापीठांतर्गत अंतिम वर्षाच्या वाणिज्य व कला शाखेचा निकाल जाहीर झाला आहे. विज्ञान शाखेचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याची माहिती गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पी. पी. कुलकर्णी यांनी दिली. जिह्यातील 26 महाविद्यालयातील 5290 विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे.
ऑनलाईन परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठार्तगत दोन केंद्रे करण्यात आली होती. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय तर चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालय या दोन लीड महाविद्यालयांच्या मार्गदर्शनाखाली जिह्यातील 24 महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्य़ा रत्नागिरी केंद्रामधून 12 महाविद्यालयामधून 3890 तर चिपळूण केंद्रातून 12 महाविद्यालयांतर्गत 1400 विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाची परीक्षा दिली होत़ी यातील सुमारे 99 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर फक्त 1 टक्का विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिल़ी संकेतस्थळावर महाविद्यालयांकडून पेपर तपासणी करुन विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करण्यात आली होत़ी ऑनलाईन परीक्षेच्या वेळी मोठय़ा प्रमाणात गोंधळ झाला होत़ा विद्यार्थ्यांना देखील मोठय़ा प्रमाणात मनस्तापाला समोर जावे लागल्याने नाराजीचा सूर उमटला होत़ा मात्र वेळेमध्ये निकाल जाहीर झाल्यामुळे समाधान व्यक्त हेत आह़े









