ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाही. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्थरातून होत आहे.
या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षा मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अंतिम वर्षांच्या परीक्षादेखील रद्द केल्या जाव्यात यासाठी अनेक विद्यार्थी संघटनेने निवेदन सादर केली आहेत.
तसेच परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांच्या मार्कशीट वर प्रमोटेड किंवा एक्झमटेडचा शेरा देऊ नये. अंतर्गत मूल्यांकना नंतर ग्रेड किंवा टक्केवारी नमूद करावी, जेणेकरून त्यांना पुढील अभ्यास किंवा रोजगार प्रक्रियेत यचा उपयोग होईल, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









