भारतीय महिला नेमबाज अंजुम मोदगिल व तेजस्विनी सावंत यांना महिलांच्या 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन्स इव्हेंटमध्ये अंतिम फेरी गाठण्यापूर्वीच गाशा गुंडाळावा लागला. अंजुम 15 व्या तर तेजस्विनी 33 व्या स्थानी फेकली गेली.
या दोघींच्या अपयशामुळे भारतीय नेमबाजी पथकाची हाराकिरी कायम राहिल्याचे देखील स्पष्ट झाले. सौरभ चौधरीशिवाय, अन्य एकाही नेमबाजाला अगदी फायनलपर्यंतही पोहोचता आले नसल्याने भारतासाठी यंदाची मोहीम अगदीच निराशाजनक ठरली. वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यविजेत्या मोदगिलने 1167 अंक मिळवले तर अनुभवी तेजस्विनी सावंतला 1154 गुणांवर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक पदार्पण करणाऱया तेजस्विनीला येथे अजिबात सूर सापडला नाही. या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत आता फक्त ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व अनुभवी संजीव रजपूत यांचीच आव्हाने बाकी आहेत.









