प्रतिनिधी / गगनबावडा
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने गगनबावडा तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.वेतनश्रेणी, पेन्शचा लाभ व अन्य मागण्यांचे निवेदन तहसिलदार संगमेश कोडे यांना देण्यात आले.
जिल्हा कर्मचारी संघाचे अध्यक्ष कॉ.अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारच्या संविधान, कामगार,शेतकरी,शिक्षण, सार्वजनिक क्षेत्र या सर्वांच्या विरोद्धात धोरण अवलंबले आहे. कोरोणा काळात घराघरांत जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा दिल्या. अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनीअंगणवाडी सेविका यांच्या वेतनाची मागणी बराच काळ प्रलंबित आहे. 30 जून 2018 च्या जी.आर.प्रमाणे अंगणवाडीसाठी पाणी, भाडेपोटी १००००, लाकडी साहित्य करिता १००००, बालकांच्या साहित्यासाठी ५००० हा निधी त्वरित द्यावा.
रिक्त जागेवर एकदा बदली हक्क मिळावा, तसेच ताजा, सकस, शिजविलेला आहार मिळावा, केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणाविरोधात २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संपात सहभागी होण्याची परवानगी मिळावी व अन्य मागण्यांबाबत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रियंका पाटील, उज्वला बोरये, वर्षा पांगळे, पुनम वरेकर, अश्विनी तेली, मिना कुरतडकर, संगिता कांबळे पालव यांचेसह गगनबावडा तालुका अंगणवाडी कर्मचारी संघाच्या ९८ सेविका, मदतनिस उपस्थित होत्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक संगिता पाटील यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Previous Articleकाँग्रेस मजबुतीसाठी मकबूल मोहोळकर पुन्हा सक्रिय
Next Article नांगरगाव येथील अत्याचारी शिक्षकास बडतर्फ करा









