प्रतिनिधी /बेळगाव
अंगडी स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा व खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून व्हीटीयूचे कार्यकारी सदस्य आर्किटेक्ट जितेंद नायक, आयआयएचे चेअरमन आर्किटेक्ट कुलदीप हंगीरगेकर उपस्थित होते.
जितेंद नाईक म्हणाले, आर्किटेक्चर हे क्षेत्र कॉपी पेस्ट करून शिकता येत नाही. यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते, असे सांगितले. कुलदीप हंगीरगेकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रमातही सहभागी होण्याचे आवाहन केले. प्राचार्या डॉ. स्फूर्ती पाटील, एच. एस. पाटील, प्रा. संगीता देसाई, प्रा. आशा राजपूत, डॉ. संजय पुजारी, प्रा. विनायक मुतगेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सुरेश अंगडी ट्रॉफी यावषी झिशान अली सयानी याला प्रदान करण्यात आली. कॉलेजमध्ये प्रथम अमृता कालकुंद्रीकर, द्वितीय पूजा देसाई, तृतीय श्रेया हुंबरवाडी यांना ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आली. प्रा. अरुण हुईलगोळ यांना उत्तम शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.









