वृत्तसंस्था/ बेनडिगो
ऑस्ट्रेलियातील बेनडिगो येथे रविवारी झालेल्या 25 हजार डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले यांनी दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
रविवारी झालेल्या या स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अंकिता आणि ऋतुजा या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या बोझोव्हिक आणि पोलंडच्या व्हेरोनिका यांचा 4-6, 6-3, 10-4 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. ऋतुजाला केदार शहाचे मार्गदर्शन मिळत आहे.









