सांगली :
सांगली जिल्ह्यात एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात १४३६ कोटी रूपयांचा जीएसटी महसूल जमा झाला आहे. जिल्हयातील करदात्यांची संख्या ३१ हजार ८९५ इतकी असून मागील वर्षीच्या तुलनेत जीसएसटीमध्ये १६ टक्के वाढ असल्याची माहिती केंद्रीय जीएसटीच्या सांगली कार्यालयाकडून देण्यात आली.
केंद्र व राज्याच्या तुलनेत सांगली जिल्हयातील जीएसटी महसूल चांगला जमा होत असल्याचेही सांगण्यात आले. विशेषतः करचुकवेगिरी विरोधात जीएसटी कार्यालयाने सुरू केलेली कारवाई, देयके जोरदार बनावट देणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. लेखापरीक्षण तसेच करचुकवे विरोधातील कारवाया, कर निर्धारण व विवरण पत्रांची छाननी व कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर यामुळे जीएसटी कर महसुलात वाढ होत आहे.
वाहनांचे सुट्टे भाग, फाऊंड्री व साखर उद्योग, दुग्धजन्य पदार्थ, मशिन पार्ट, इंजिन पार्ट, अभियांत्रिकी वस्तू दागिने, बिल्डर्स, कंत्राटदार, शीतगृहे यांचे जजीएसटी संकलनात मोठे योगदान आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या जिल्हयात १२४३ कोटीचा जीएसटी महसूल जमा झाला होता. त्या तुलनेत यंदा मार्च २०२५ अखेर १४३६ कोटीचा जीएसटी महसुल जमा झाला. यात १९३ कोटीची वाढ असून गेल्या वर्षपिक्षा यंदा १६ टक्के वाढ असल्याचे निरीक्षण जीएसटी कार्यालयाने नोंदविले आहे.
देशाचा विचार करता देशात जजीएसटी संकलनात मोठे योगदान आहे. १,५१,२५,००४ करदाते आहे. मागील आर्थिक वर्ष एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत जीएसटीचे कलेशक्न २०,१८,२४९ कोटी रूपये होते.
आता एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत २२,०८,८६१ कोटी इतका जीएसटी महसूल जमा झाला आहे. तर महाराष्ट्रामध्ये १८,२४,१५२ करदाते आहेत.
मागील आर्थिक वर्ष एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ अखेर ३,२७,७३७कोटीची जीएसटी वसुली होती. यंदा ती ३,५९,८५५ कोटी म्हणजे ९.८ टक्के जास्त आहे








