उंब्रज :
दोन कंपन्यातील परस्पर व्यवहारातून तब्बल १४ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कराड तालुक्यातील प्रांजीत पाटील याच्यासह अन्य संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी वेस्ट, मुंबई येथील क्लियरसिथ लॅब लिमिटेड ही कंपनी औषध निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. ग्रामीण भागात कंपनीची ब्रँच निर्माण करून ग्रामीण भागातील तरुणाना रोजगार मिळावा यासाठी फिर्यादी क्लियरसिंथ लॅब कंपनीचे कार्यकारी संचालक पी. बी. गिरासे यांनी तासवडे व सातारा एमआयडीसीमध्ये सर्च घेतली. दरम्यान, संशयित प्रांजीत पाटील यांनी फिर्यादीशी चर्चा करून सुरुवातीला एमओयू करून दहा कोटी रुपयास प्रांजीत पाटील यांची वरुणेश्वर ऑरगेनिक ही कंपनी विक्री करण्याचे ठरविले. संशयिताने जानेवारी २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत वेळोवेळी १४ कोटी ११ लाख घेऊन संशयित प्रांजीत पंजाबराव पाटील, सी. प्रियंका पंजाबराव पाटील, पंजाबराव विठ्ठलराव पाटील, अमराजित पंजाबराव पाटील (सर्व रा. वारूंजी, सिद्धनाथ मंदिराजवळ, ता. कराड, सध्या रा. सोसायटी पेट्रोलपंपाजवळ, कराड), सुनील वामनराव ढोकणे (रा. ३०१, तिसरा मजला, आटोपिया बिल्डींग, आळंदी रोड, देहू डीमार्ट समोर, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी बीटीए करार रजिस्टर करण्यासाठी नकार देऊन बीटीए करारावर असलेल्या सध्या या आमच्या नाहीत असे सांगून भूखंड हस्तांतर करून दिले नाही. म्हणून गुन्हा नोंद झाल्यानंतर संशयित प्रांजीत पाटील यांना अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक किरण भोसले करत आहेत.








