इस्लामपूर :
शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करुन पाच टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून वाळवा तालुक्यातील पेठ येथील रणजीत राजेंद्र खटाळ (30) यांची एकाने 10 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 19 ऑगस्ट 2021 ते 3 नोव्हेंबर 2021 या कालावधीत घडली.
हिंदूराव हणमंत साळुंखे (46 रा. कार्वेनाका कराड), असे संशयित आरोपीचे नाव आहे. खटाळ हे शेती करतात. त्यांचा विश्वास संपादन करुन साळुंखे याने स्वत:च्या फायद्यासाठी खटाळ यांच्याकडून वेळोवेळी 11 लाख रुपये शेअर्स मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी घेतले. खटाळ यांनी ही रक्कम युनियन बँक शाखा पेठ मधून दिली. साळुंखे याने त्यातील एक लाख रुपये त्यांना परत दिले. 10 लाख रुपयांसाठी वारंवार पाठपुरावा करुन ही मूळ रक्कम व पाच टक्के परतावा मिळाला नाही, त्यामुळे रणजीत खटाळ यांनी या प्रकरणी इस्लामपूर पोलीसात वर्दी दिली.








