वॉशिंग्टन \ ऑनलाईन टीम
अमेरिकेजवळील अटलांटिक महासागरातील देश असलेल्या हैती या कॅरेबियन देशात शनिवारी भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. ७.२ इतक्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झाली आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे १ हजार २९७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५ हजार ७०० जण जखमी झाले आहेत.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शनिवारच्या ७.२ तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपामुळे हैतीमध्ये अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत भूकंपामुळे १,२९७ जणांचा मृत्यू झाला आहे तर हजारो जण जखमी झाले आहेत. भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने सांगितले की, ‘या तीव्र भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून १२५ किलोमीटर अंतरावर होते. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातील संकट अजून वाढू शकते, कारण तूफान ग्रेस सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हैतीत पोहोचू शकते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









