नवी दिल्ली
हेक्सावेअर टेक्नॉलॉजिस या कंपनीने या वषी 10 हजार जणांची नोकर भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. सदरच्या कंपनीवर जागतिक स्तरावरील खाजगी इक्विटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी कार्लाइल यांचे नियंत्रण आहे. सध्याला हेक्सावेअर टेक्नॉलॉजीसकडे 25 हजार जण नोकरी करत आहेत. कंपनीत नोकरी सोडणाऱयांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नव्याने भरती करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.









