प्रसिद्ध अभिनेत्याकडून वादग्रस्त विधान
वृत्तसंस्था/ हैदराबाद
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता विजय देवरकोंडा याने सर्वाना मताधिकार असू नये असे मत व्यक्त केले आहे. राजकारणात आलो तर हुकुमशहा होणे पसंत करेन असे अजब विधानही त्याने केले आहे. फिल्म कम्पॅनियन या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये विजय याला अन्य कलाकारांप्रमाणे राजकारणात येण्याची इच्छा आहे का असे विचारण्यात आले होते. यावर उत्तर देतानाच त्याने हे वादग्रस्त विधान केले आहे. विजय याला अर्जुन रेड्डी चित्रपटाद्वारे मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
अभिनेत्याने वर्तमान निवडणूक प्रणालीला विरोध दर्शविला आहे. राजकारणासाठी माझ्याकडे संयम नाही. पैसे मिळविण्यासाठी मतदान का केले जाते? स्वस्त मद्याकरता मत का दिले जाते? केवळ श्रीमंत व्यक्तींनीच मतदान करावे असे माझे म्हणणे नाही. मध्यमवर्गाकडे सर्वाधिक हिस्सेदारी असून ते सुशिक्षित असतात आणि पैशांसाठी मत बदलत नाहीत. बऱयाच लोकांना कुणाला मत देतोय आणि का देतोय हेच माहिती नसते असा दावा त्याने केला आहे.