ऑनलाईन टीम/तरुण भारत
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात एका फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यात ६ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १५ महिला होरपळल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर तिथं अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. यात काही महिला गंभीररित्या होरपळल्या असल्याचं समजते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, अग्निशमन दलाचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी मोठा प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला असून, आजूबाजूच्या परिसराची चौकशी सुरू आहे.
स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती देताना डीएसपी हरोली अनिल पटियाल म्हणाले की, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा स्फोट कसा घडला. याचे सर्व बाजूंनी तपास सुरू आहेत. सध्या स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे.