ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा : शेवटपर्यंत संपूर्ण गाव काढला पिंजून
वार्ताहर/ हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास लोकशाही आघाडीतर्फे वॉर्ड क्रमांक 2 मधून उभे असलेले सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर व वॉर्ड क्रमांक 4 मधून उभे असलेले उमेदवार नागेश मन्नोळकर यांना मतदार व ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा लाभला असून त्यांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यापर्यंत संपूर्ण गाव पिंजून काढण्यात आले.
हिंडलगा आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना भेडसावणाऱया सर्व समस्या सोडविणे, हा एकच उद्देश डोळय़ासमोर ठेवून रामचंद्र मन्नोळकर सलग चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचे लहान बंधू नागेश मन्नोळकर हेदेखील दुसऱयांना निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याशिवाय रामचंद्र मन्नोळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास लोकशाही आघाडीमार्फत वॉर्ड क्रमांक 1 मधून कल्लाप्पा ऊर्फ सतीश काकतकर, रेणुका अष्टेकर, वॉर्ड क्रमांक 2 मधून अजय मास्ते, आरती कडोलकर, रामचंद्र मन्नोळकर व सुमन राजगोळकर, वॉर्ड क्रमांक 3 मधून एन. एस. पाटील, संगीता पलंगे, वॉर्ड क्रमांक 4 मधून चंद्रकांत बांदिवडेकर, दीपा हंगिरगेकर, नागेश मन्नोळकर, वॉर्ड क्रमांक 5 मधून रेणु गावडे, नितीनसिंह राजपूत, मीनाक्षी हित्तलमनी, सीमा देवकर, वॉर्ड क्रमांक 7 मधून राकेश बेटगेरी, वॉर्ड क्रमांक 9 मधून ज्युली बेनट्ट स्वामी, रवि गायकवाड, वॉर्ड क्रमांक 11 मधून प्रभूकुमार पुजार, रुपा उरणकर, स्वाती वेसणे, वॉर्ड क्रमांक 12 मधून अनिल मद्यापगोळ, पूजा जगताप व स्नेहल कोलेकर हे निवडणूक लढवित आहेत. या सर्व उमेदवारांची भव्य मिरवणूक काढून मतदारसंघात झंझावाती प्रचार करण्यात आला. मतदारांच्या भेटी घेऊन आपल्या धोरणाबद्दल माहिती देण्यात आली. त्यामुळे मतदारांनी देखील ग्रामविकास लोकशाही आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास दर्शवत आपला पाठिंबा जाहीर करून प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता गावच्या विकासासाठी लोकशाही आघाडीलाच विजयी करावे, असे आवाहन आघाडीप्रमुख रामचंद्र मन्नोळकर यांनी केले आहे.









