म. ए. समितीकडून जागेची स्वच्छता
प्रतिनिधी/ बेळगाव
1986 च्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात तसेच सीमा चळवळीतील आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांचे हिंडलगा येथे स्मारक भवन बांधण्यात येणार आहे. म. ए. समितीच्यावतीने या स्मारक परिसराची स्वच्छता व सपाटीकरण करण्यात आले.
म. ए. समितीच्यावतीने हुतात्म्यांच्या त्यागाची माहिती पुढील पिढीला समजावी, या उद्देशाने हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार आहे. म. ए. समितीच्यावतीने हुतात्मा भवन बांधण्यासाठी 11 गुंठे जागा घेण्यात आली आहे. या जागेचे सपाटीकरण जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, तालुका समितीचे सरचिटणीस एम. जी. पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, अभियंता आर. एम. चौगुले, मदन बामणे, संजय पाटील, एन. के. कालकुंद्री, अनिल हेगडे, अशोक चौगुले, बी. डी. मोहनगेकर, सागर कट्टणेवर, एस. आर. पाटील, एस. आर. कालकुंद्री व इतर उपस्थित होते.









