महिन्याभरात तीन कैद्यांचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱया एका कैद्याचा मंगळवारी मृत्यू झाला. आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. गेल्या महिन्याभरात हिंडलगा कारागृहातील तीन कैद्यांचा आजाराने मृत्यू झाला आहे.
सिध्दाप्पा अडव्याप्पा कमते (वय 51, रा. सुनधोळी, ता. गोकाक) असे त्याचे नाव आहे. सिध्दाप्पा हा असाध्य रोगाने त्रस्त होता. प्रकृती खालावल्याने 26 मे रोजी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला.
उपलब्ध माहितीनुसार 2010 मध्ये कुलगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खून प्रकरणी सिध्दाप्पाला अटक झाली होती. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. असाध्य रोगाने त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरात कारागृहातील तीन कैद्यांचा आजाराने मृत्यू झाला आहे.









