वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी हासन बटाटय़ाला 4 हजार प्रतिक्विंटल असा विक्रमी दर झाला तर जवारी बटाटय़ाचा भाव 1500 ते 3200 रु. झाला. पावसाळी बटाटय़ाला सुरुवातीपासून चांगला भाव मिळत असल्याने उत्पादकामध्ये समाधान पसरले आहे.
बाजारात नवीन कांदा 500 रु. तर जुना कांदा 300 रु. हासन बटाटा 500 रु. तर जवारी बटाटा 400 रु. वधारला. बाजारात कांदा 60 ट्रक इतकी आवक होती. यामध्ये 25 ट्रक नवीन कांदा आवक कर्नाटकमधून झाली होती. 10 ट्रक जुना कांदा आवक होती उर्वरित सर्व कांदा आवक महाराष्ट्रातून झाली होती. अशी माहिती व्यापारी विवेक पाटील यांनी दिली.
बाजारात शनिवारी 4 ट्रक हासन बटाटा आवक 150 पिशव्या जवारी बटाटा आवक झाली होती. इंदौर बटाटय़ाची आवक पूर्णपणे थांबली होती. याचा परिणाम बटाटय़ाचा भाव वाढीवर झाला, अशी माहिती लेखापाल सुनील संभाजी यांनी दिली. हासन बटाटा चांगल्या प्रतिचा 3500 ते 400 तर दुय्यम दर्जाचा बटाटा 2700 ते 3400 असा झाला.
बाजारात जुना कांदा कर्नाटक 1500 ते 1600 नवीन 1000 ते 1700 तर महाराष्ट्राचा जुना कांदा 2200 ते 2300 रु. असा झाला.









