वार्ताहर / साळवण
उत्तर प्रदेश राज्यातील हाथसर येथील १९ वर्षीय तरुणीवर आमानुष्य अत्याचार करुन हत्या झालेल्या तरुणीच्या पीडीत कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांची अडवणूक करुन योगी सरकारने पोलिसांकरवी धक्काबुकी व मारहाण झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने उत्तरप्रदेश मधील योगी सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमात्मक पुतळाला जोड्याने मारण्यात आले.
उत्तरमधील योगी सरकार गुंडगिरी व दडपशाही करत विरोधी पक्षाच्या नेत्यांची दडपशाही करत मारहाण करत आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांना एस.पी.जी सुरक्षा असतानाही त्यांना पोलिसांनी धक्काबुकी करत मारहाण केली त्यामुळे गुंडागिरी व दडपशाही करणारे योगी सरकार बरखास्त करून उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेले कामगार व कृषी विधेयक नामंजूर करण्याची मागणीही करण्यात करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बयाजी शेळके, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील,करवीर विधानसभा उपाध्यक्ष संदिप पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. नायब तहसिलदार संजय वळवी यांनी उत्तरप्रदेश मधील योगी सरकार बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
या रोको आंदोलन प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,जि.प.सदस्य भगवान पाटील, सभापती संगिता पाटील, उपसभापती पांडूरंग भोसले,कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बयाजी शेळके, निवडेचे सरपंच दगडू भोसले, चंद्रकांत खानविलकर, सहदेव कांबळे, संदिप पाटील, सुर्यकांत पडवळ, दगडू जाधव, संभाजी पाटील, दादू पाटील, पांडूरंग खाडे, प्रकाश मोरे, आदर्श कोटकर, नंदकूमार पाटील आदीसह यूवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









