हातकणंगले / प्रतिनिधी
मध्यप्रदेश वरून आलेल्या एका पन्नास वर्षीय नागरिकाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने हातकणंगले गावात खळबळ उडाली असून सदर व्यक्ती ही बुरानपुर, मध्यप्रदेश येथून काही दिवसांपूर्वी हातकणंगले येथील आपल्या घरी आली होती. याची कल्पना नगरपंचायत तिला कळतात. त्या व्यक्तीस 19 तारखेला संस्थात्मक विलीगीकरण मध्ये ठेवण्यात आले होते व 20 तारखेला याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. आज सायंकाळी हे नमुने पॉझिटिव्ह आल्याने सदर व्यक्तीस तात्काळ सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. सदर व्यक्तीबरोबर बुरानपुर मधून कोरोची गावातील एक व्यक्तीही आली होती. या व्यक्तीलाही प्रशासनाने तात्काळ विलगीकरण करून त्या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सदर व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध प्रशासन तात्काळ घेऊन त्यांनाही विलगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हातकणंगले व कोरोची परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.