हातकणंगले / प्रतिनिधी
कृषि निविष्टा विक्रेताना मागणी प्रमाणे खते, बियाणे व किटकनाशके मिळावीत सॅम्पलिंग कंपनी गोडावून मधून करावे. किटकनाशक सारखे बियाणे व खताचे परवाने कायम स्वरूपी मिळावेत. बियाणे खता बरोबर लिंकीग घ्यावे लागत आहे ते बंद करावे . गैर मार्गाने व्यवसाय करणार्या दुकानदारावर कठोर कारवाई करावे आशा मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादाजी भुसे यांना हातकणंगले तालुका रासायनिक खते, किटकनाशके , बि-बियाणे विक्रेता असोशियन हातकणंगले (रजिस्टर संस्था) यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी खा. धैर्यशील माने, असोशियनचे अध्यक्ष पत्रकार विनयकुमार पाटील, खजिनदार देवाप्पा बागणे, सचिव सुभाष पाटील, संचालक मिलींद उपाध्ये यासह इतर संचालक व दुकानदार उपस्थितित होते. निवेदनाचा विचार करुन काहीतरी मार्ग काढू असे अश्वासन कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.








