
कोरोना संकटादरम्यान केंद्रासह राज्य सरकारांनीही स्वतःच्या पातळीवर सज्जता चालविली आहे. केरळच्या अलप्पुझा जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हाउसबोटला आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 1500 बेडची क्षमता वाढून 2000 वर पोहोचणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. अंजना यांनी सांगितले आहे. देशभरात कोरोना संकटादरम्यान अनेक अभिनव मार्ग शोधले जात आहेत.
भारतातच अधिक सुरक्षित : पर्यटक

टाळेबंदीपूर्वी उदयपूर येथे दाखल झालेले 15 देशांचे 74 पर्यटक विविध हॉटेल्समध्ये वास्तव्यास आहेत. कोरोनाने सर्वाधिक ग्रस्त अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांच्या पर्यटकांचा यात समावेश आहे. सद्यस्थितीत आम्ही भारतात मायदेशापेक्षा अधिक सुरक्षित आहोत. दूतावासाने आदेश दिल्यास त्याचे पालन करू. परंतु टाळेबंदीनंतरही आम्ही उदयपुरातून बाहेर पडण्याची घाई करणार नसल्याचे या पर्यटकांनी म्हटले आहे.








