सत्तरी तालुक्यातील शेतकरी हवालदिल : कृषी अधिकाऱयांकडून पाहणी,
प्रतिनिधी /वाळपई
सातत्याने हवामानात होणाऱया बदलाचा परिणाम पिकांवर होत आहे. सत्तरी तालुक्मयातील मिरची लागवडही या सततच्या बदलत्या हवामानामुळे धोक्मयात आली आहे. या लागवडीला विशिष्ट रोग लागला असून उत्पादकांनी कृषी खात्याने गांभिर्याने विचार करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती, त्यानुसार कृषी अधिकाऱयांनी पाहणी करुन काही उपाययोजनाही सूचविल्या आहेत.
सत्तरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात मिरचीची लागवड होते. गेल्या दोन महिन्यांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. त्याचा परिणाम मिरचीवर दिसत आहे. अनेक गावातील मिरची लागवडींवर जंतूंचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे?. यामुळे मिरचीची लागवड धोक्यात आली आहे?. काही भागांत मिरची रोपे मरत असल्यामुळे लागल्याने उत्पादकांमध्ये चिंता वाढलेली आहे. याबाबतच्या तक्रारी वाळपई विभागीय कृषी अधिकाऱयांच्या कार्यालयात आल्यानंतर शेतकी अधिकारी विश्वनाथ गावस, साहाय्यक अधिकारी दत्तप्रसाद जोग, समीर गावस, रणजित म्हापसेकर यांनी वेगवेगळय़ा ठिकाणी मिरची उत्पादकांशी संवाद साधून प्रत्यक्षपणे मिरची लागवडीच्या बागेमध्ये भेट देऊन पाहणी केली.
विश्वनाथ गावस यांनी सांगितले की, सातत्याने हवामानामध्ये बदल होऊ लागल्यामुळे लागवडीला विशिष्ट प्रकारच्या जंतूंचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मिरचीवर प्रादुर्भाव दिसत असल्यामुळे ही लागवड वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उत्पादकांनी विशिष्ट काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे?. यासाठी अनेक औषधे आजही उपलब्ध आहेत. त्यांचा वारंवारपणे वापर करावा. त्यांचा वापर केल्यास मिरची लागवडीवर निर्माण झालेला धोका दूर होऊ शकतो, असे गावस यांनी स्पष्ट केले.
अशी करा उपाययोजना : विश्वनाथ गावस
मिरची पिकावरील माईट व थ्रीप्स किडीमुळे पुढे पसरलेला लिफ कर्ल व्हायरस रोग पूर्ण सत्तरी तालुक्मयात वेगाने पसरला आहे. पूर्ण गोव्यात याची लागण होते आहे. या रोगांवर 100 टक्के प्रभावी असे औषध उपलब्ध करणे कठीण आहे. तरीही इमिडा हे औषध 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून मिर्ची रोपावर लवकरात लवकर फवारावे. आठ दिवसांनी हाच प्रयोग पुन्हा करावा. हे इमिडा औषध जुवारी जंक्शन कारापूर तिस्क येथे टाटामिडा या नावाने उपलब्ध आहे. 100 मिली बाटलीची किंमत जवळपास 250 रु. आहे. तसेच सेंद्रीय पद्धतीने या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी 80 मिली नीमतेल 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास खूप प्रमाणात या रोगाचे नियंत्रित झाल्याचा हेदोडे येथील प्रगतीशिल शेतकरी अशोक जोशी यांचा अनुभव त्यांनी मांडला आहे. वरील दोन्ही प्रकाराने लवकरात लवकर शेतकऱयांनी आपल्या मिरची पिकाचा बचाव करावा, असे आवाहन सत्तरीचे विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी केले आहे.









