प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय हवाई दलाच्या 3624 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षांत समारंभ सांबरा हवाई दल केंद्राच्या मैदानावर शनिवारी शानदारपणे पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून बेंगळूर येथील हेड क्वॉर्टर ट्रेनिंग कमांडरचे टेक्निकल टेनिंग ऑफिसर एअर व्हाईस मार्शल विवेक पिलाई उपस्थित होते. प्रारंभी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एअरमन्सनी वाद्यवृंदाच्या तालावर पथसंचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली. एअर व्हाईस मार्शल पिलाई यांनी खुल्या जीपमधून परेडची पाहणी केली. त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बेस्ट इन सर्व्हिस टेनिंगमधील सर्वोत्तम एअरमन हा पुरस्कार गगन शिसोदिया यांना, बेस्ट इन अकॅडमी पुरस्कार अमित सिंग भदोरिया यांना, बेस्ट मार्क्समन पुरस्कार विरेंद्र चौधरी आणि ओव्हरऑल फर्स्ट इन ऑडर ऑफ मिरिट हा पुरस्कार विनीतकुमार यांना प्रदान करण्यात आला.
एअरव्हाईस मार्शल विवेक पिलाई यांनी, शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. तसेच प्रशिक्षणार्थींनी नवतंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. कौशल्य शिक्षण घेतले पाहिजे, असे सांगितले. देश संरक्षणासाठी निडरता, धाडस आवश्यक आहे, असे स्पष्ट केले. कोविड-19 विरोधात लढाई संपलेली नसून सर्वांनी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहनही केले. याप्रसंगी वरि÷ अधिकारी व प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक उपस्थित होते.









