नवी दिल्ली
विमान वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱया हवाई इंधनाचे दर 16 टक्के वाढले आहेत. महिन्यात दुसऱयांदा इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. नवी दिल्लीत 5419 रु. प्रति किलो लिटर इतकी वाढ झाली असून 39 हजार 69 रुपये इतका नवा दर झाला आहे. कोलकाता शहरात दर 44 हजार 24 रुपये, चेन्नईत 40 हजार 240 रुपये तसेच मुंबईत 38 हजार 565 रुपये प्रति किलो लीटर इंधनाचे दर असणार आहेत. 16 जूनपासून नवा दर अंमलात येत आहे. यापूर्वी 1 जूनला इंधनाच्या दरात प्रति किलो लिटरमागे 11 हजार रुपये वाढ करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात मेमध्ये हवाई इंधन दरात 23 टक्के कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरत्या तेलाच्या किमतीमुळे तसे करण्यात आले होते. फेब्रुवारी आणि मे दरम्यान इंधनाच्या दरात दोन तृतियांश कपात करण्यात आली होती.









