जालधंर
सध्याच्या घडीला कोरोना महामारीचा तडाखा पंजाबमधील काही जिल्हय़ांना बसला आहे. लॉकडाऊन केल्यानंतर अनेक ठिकाणी गरजू लोकांच्या अन्नधान्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या दरम्यान, भारताचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने पुढाकार घेत जालधंरमधील 5000 हजार कुटुंबियांच्या अन्न-धान्याचा प्रश्न सोडवला आहे. हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता यांनी जालंधरमध्ये असलेल्या गरीब आणि गरजू 5000 कुटुंबाला अन्नधान्य दिले आहे. यापुढे असे काम करण्याची ताकद मिळो, ही प्रार्थना आहे. असे हरभजनने ट्विट केले आहे. याशिवाय, राज्यातील नागरिकांनी संकटमय काळात घाबरुन जाऊ नये. घरीच सुरक्षीत राहत सर्वांची काळजी घेण्याचे आवाहनही त्याने यावेळी केले आहे.









