प्रतिनिधी / बेळगाव
रेडक्रॉस सोसायटी आणि हनुमाननगर नागरिक संघटना व भाजपच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेचे उद्घाटन भाजपच्या राज्य सचिव उज्ज्वला बडवाण्णाचे व रेडक्रॉस सोसायटीचे सेपेटरी डॉ. डी. एन. मिसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त लसीकरण मोहीम तसेच योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रभाकर लाटूकर यांनी योगासनाची माहिती दिली. यावेळी उत्तर विभागाचे अध्यक्ष पांडुरंग धामणेकर, अशोक थोरात, रेडक्रॉस सोसायटीच्या सदस्या सरोजिनी नडुवीनहळ्ळी, प्रा. एस. एन. मुलीमनी, रवी पाटील, डॉ. अभिषेक नरट्टी, सागर कडेमनी, प्रवीण हिरेमठ, ए. पी. मनगे, तोटगेर, प्रकाश ऐहोळे, डॉ. ए. एस. चिंगळी आदी उपस्थित होते.
डॉ. डी. एन. मिसाळे यांनी कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी स्टाफ नर्स शकुंतला रेड्डी, अंगणवाडी कार्यकर्त्या जयश्री आणि भारती यांचा सत्कार करण्यात आला.









