ऑनलाईन टीम / पाटणा :
जनता दल यूनायटेड (जेडीयू) पक्षाचे उपाध्यक्ष आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि माजी राज्यसभा खासदार पवन वर्मा यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल प्रशांत किशोर व पवन वर्मा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर लगेचच प्रशांत किशोर यांना या निर्णयावर आपली प्रतिक्रिया ट्विटर वर व्यक्त केली आहे. त्यांनी नितीश कुमार यांना धन्यवाद देत देव तुमचं भलं करो असं म्हटलं आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘धन्यवाद नितीश कुमार. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. देव तुमचं भलं करो’.