वार्ताहर/ किणये
हंगरगे गावातील जागृत मरगाई देवी मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा सोमवारी मोठय़ा उत्साहात व भक्तीमय वातावरणात झाला. भूमीपुजनानिमित्त गावात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील सुवासिनी मेठय़ा संख्येने कलश घेऊन सहभागी झाल्या हेत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलमेश्वर सोसायटीचे चेअरमन विष्णू सोनोलकर हे होते.
भूमिपूजन माजी तालुका पंचायत सदस्य कृष्णा हुंदरे व सौ. विद्या हुंदरे या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. गावातील मरगाई देवीचा जीर्णेद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळय़ाला गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
टाळ मृदुंग व पारंपरिक वाद्याच्या गजरात गावात मिरवणूक काढून सर्व देवदेवतांची पूजा करण्यात आली. त्यानंतर भूमिपूजनाचा सोहळा झाला. स्वागताध्यक्ष म्हणून माजी ग्राम पंचायत सदस्य गोपाळ गोडसे, मोनाप्पा मुतगेकर, यशवंत नाईक हे होते. प्रास्ताविक माजी जिल्हा पंचायत सदस्य दिलीप कांबळे यांनी केले.
मल्लाप्पा पार्लेकर, मनोहर शहापूरकर, यल्लाप्पा पाटील, सहदेव सावंत, संदीप चलवेटकर, परशराम कुंडेकर, शिवाजी मुतगेकर, यल्लाप्पा सावगांवकर, बाळू नाईक, लक्ष्मण नाईक, राजू कांबळे, गोपाळ कांबळे, काळू पाटील, महादेव सोनोलकर, चुडाप्पा कांबळे, कल्लाप्पा पिशाणी आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
महालक्ष्मी फोटो पूजन मारुती आजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश फोटो पूजन यल्लाप्पा पाटील यांनी पेले. तसेच पिराजी पाटील, परशराम पाटील, यल्लाप्पा शहापूरकर, परशुराम नाईक, भोमाणी पार्लेकर, गंगाराम शहापूरकर, रामचंद्र हलकर्णीकर, सन्नाप्पा कांबळे आदींच्या हस्ते विविध देवदेवतांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महेश नाईक, बसवाणी तलवार, सिद्राय नाईक, परशराम नाईक, उमेश मुद्दी, परशराम नाईक, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळू पाटील यांनी पेले. तर विशाल सावंत यांनी आभार मानले.









