पैशांसाठी कोणतीही कामे करणाऱया काही जणांच्या गटाला कोणताही आजार किंवा जखम बरी करण्याचे वरदान मिळालेले आहे. पण हे वरदान जगापासून त्यांनी लपवले आहे. पण अचानक असाच वरदान असलेला आणखी एक गट कार्यरत असल्याचे त्यांना कळते. त्यांचे हे रहस्य उघड करण्याचा प्रयत्न कुणितरी करत असल्याची शंका त्यांना येते. मग त्यांच्या स्वातंत्र्याची अनोखी लढाई सुरू होते. त्याची कथा द ओल्ड गार्ड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गिना प्रिन्स-बिथवुडने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चार्लिज थेरॉन, किकि लेन, मारवान केंझारी, ल्युका मारिनेली यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये आहेत.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई









