सांगली/प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने २०१९-२० मधील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पाच लाख लोकसंख्येच्या गटात महानगरपालिकेने देशपातळीवर ३६ तर राज्यात ९ वा क्रमांक पटकावला आहे. गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण च्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी वहर्च्युअल ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. आयुक्त श्री नितिन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार उप-आयुक्त स्मूर्ती पाटील यांच्या नियंत्रणाखाली डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे, सह आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक परिश्रम, प्रयत्नामुळे गत दोन वर्षे म्हणजेच २०१७-१८ आणि २०१८-१९ रोजी सांगली देशपातळीवर महानगरपालिकेचा अनुक्रमे ११९ आणि १०६ क्रमांक मिळाला होता.
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण मधील कचरा व्यवस्थापन, कचरा उठाव, कचरा विलगीकरण, सार्वजनिक शौचालय स्वच्छता, मैला साफ करणे आणि वाहतूक, कचरा वेचक महिला, सार्वजनिक सौंदर्यीकरण, विद्यार्थी कआणि नागरिक सहभाग, स्वच्छता ऍप, सार्वजनिक स्वच्छता, कचरा घंटागाड्या, कचरा कोंडाळी, पाणी व्यवस्थापन, सांड पाण्याचा पुनर्वापर, घातक कचरा, कचऱ्याचे इतर प्रकार आणि त्यावरील प्रक्रिया, झोपड्य पट्ट्या व्यवस्थापन आणि सुशोभीकरण, सार्वजनिक पाणवठे यांची स्वच्छता, इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली आहे








