ऑनलाईन टीम / रियाध :
ब्रिटनमध्ये नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आढळून आल्यामुळे खबरदारी म्हणून सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीच्या जीएसीएने अधिसूचना जारी केली आहे.
ब्रिटनमधील नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे अनेक देश आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करत आहेत. सौदीनेही काही अपवाद वगळता सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी आणखी एक आठवड्यासाठी वाढवली जाऊ शकते.
सौदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व परदेशी विमानांना सौदीबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे जीएसीएच्या अधिसूचनेत म्हटले आहे.