तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 118 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 56787
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6343
प्राप्त तपासणी अहवाल : 56752
प्रलंबित तपासणी अहवाल : 35
निगेटिव्ह अहवाल : 50409
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 401
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1086
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4856