मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने 42 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात बुधवारी 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा उपचार घेऊन बरे झाल्याने 42 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर शहरात बुधवारी 482 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 57 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 425 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 57 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 32 पुरुष तर 25 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8063 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 76766
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8063
प्राप्त तपासणी अहवाल : 76766
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 687003
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 463
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 969
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 6631









