सोलापूर संवाद
प्रतिनिधी/सोलापूर
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये शटिंग करणारे इंजिन सकाळी 11.30 ते 11.45 च्या दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक एक जवळ घसरले. व्हील अलाईटमेंट खराब झाल्याने शटिंग करणारे इंजिन रुळावरुन घसरले. यामुळे काही काळ स्थानकावरील गाडय़ांना उशिर झाला. बेंगळूर-उद्यान एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफार्म क्रमांक एकवर असताना इंजिन घसरले आणि या गाडीस एक तास उशिर झाला. रेल्वे प्रशासनास ही माहिती कळताच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
इंजिन नंबर 13571 डब्लूडीजी 3 ए. कल्याण यार्डामध्ये शटिंग करत असताना हा प्रकार घडला. इंजिनचे पुढील दोन चाके यामध्ये रुळावरुन घसरली. स्थानकावर येत असताना उजव्या बाजूस इंजिन घसरले. या इंजिनला कोणतेही डबे नसल्याने कोणताही अपघात झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनांकडून सांगण्यात आले. इंजिनचे काम तत्काळ हाती घेण्यात आले असून, स्थानकावर येणाऱया सर्वच गाडय़ा या वेळेवर धावत होत्या. इंजिनच्या कामास एक तास ते दीड तास कालावधी लागला. या अपघाताची माहिती मिळताच मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे मंडल रेल प्रबंधक शैलश गुप्ता, प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक डी. के. सिंग, स्टेशन डायरेक्टर गजानंद मीना, तसेच रेल्वेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, आरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.









