सोलापूर : प्रतिनिधी
हाताला मार लागल्याने उपचारासाठी आशाबाई महादेव कांबळे यांना नातेवाईकांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी दाखल केले होते. परंतु त्यांच्यावर दुपारपर्यंत कोणतेही उपचार केले नाहित. परिणामी वेळेवर उपचार न झाल्याने त्यांचे रविवारी दुपारी निधन झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. तसेच संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करावी, मृत्यूचे नेमके कारण सांगावे, अशी मागणी नातेवाईक अशोक मस्के यांनी केली.
आशाबाई महादेव कांबळे यांच्या हाताला मार लागल्याने त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी रविवारी सकाळी 11 च्या दरम्यान दाखल केले होते. नियमानुसार ओपीडीमध्ये जाऊन केस पेपर काढून उपचारासाठी 17 नंबर व इतर विभागात नातेवाईक घेऊन गेले. विविध चाचण्या केल्या. कोरोनाचीदेखील चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. पुन्हा त्याच विविध ठिकाणी डॉक्टरांनी रुग्णास घेऊन जाण्यास सांगितले. परंतु कोठेच उपचार केले गेले नाहित. दरम्यान रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्यास ए ब्लॉक येथील कोरोना वॉर्डात दाखल केले. त्यानंतर रूग्ण दगावल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.
यादरम्यान रुग्णावर सकाळपासून ते दुपारपर्यंत कोणतेच उपचार केले गेले नाहीत. परिणामी रूग्ण दगावल्याचे नातेवाईक अशोक मस्के यांनी सांगितले. त्यामुळे यातील उपचार न करणार्या डॉक्टरांवर कारवाई करावी, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे म्हणत नातेवाईकांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
प्रकरणातील माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ
उपचारासाठी रूग्ण वेळेवर सिव्हीलमध्ये आणल्यास असे घडणार नाहि. येथील डॉक्टर व सर्वजण मार्चपासून कोरोना काळात चांगली सेवा बजावत आहेत. परंतु या प्रकरणातील माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ.
-डॉ. एस. ए. जयस्वाल, प्रभारी अधिष्ठाता
Previous Articleकोल्हापूर : चिकोत्रा धरण पुर्ण क्षमतेने भरले
Next Article रत्नागिरीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडाले









