प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यातील १८ गावांतून आज एकूण ७७ कोरोना बाधित रुग्ण असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून कुर्डुवाडी, रिधोरे, पापनस, टेंभुर्णी, शिराळ, दहिवली, पिंपळखुंटे,भोसरे, महिंसगाव, अंबाड, शिराळ मा, पिंपळनेर, पालवण, कुर्डू, बेंबळे, तुळशी, मोडनिंब, दारफळ या १८ गावांत हे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात कुर्डुवाडी येथे ६ , रिधोरे येथे ४, पापनस येथे १, टेंभुर्णी येथे १४, शिराळ येथे १, दहिवली येथे १, पिंपळखुंटे येथे ४,भोसरे येथे ८,महिंसगाव येथे ३, अंबाड येथे २, शिराळ मा येथे १, पिंपळनेर येथे १, पालवण येथे १, कुर्डू येथे १, बेंबळे येथे १४, तुळशी येथे १,मोडनिंब येथे १, दारफळ येथे १३ जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा २००३ झाला असून यामधील १०३१ बाधित उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित ९७२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर नाडी येथील एक महिला मृत झाली असून आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. टेंभुर्णी, बेंबळे, दारफळ यांसारख्या ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून नागरिकांनी सुरक्षेची सर्व काळजी घेणे आवश्यक आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









