प्रतिनिधी / निलंगा
पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील कार चालकाने दुचाकीस्वारास धडक देवून ५० ते ६० फूट फरफटत नेले. या अपघातात तालुक्यातील अनसरवाडा पाटीनजीक एका प्रसिद्ध आडत व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते असणारे बालाजी उसनाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला. रात्री उशिरा निलंगा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनसरवाडा येथील बालाजी उसनाळे (४०) वर्ष हे काल, बुधवारी सायंकाळच्या सुमारास गावाकडे निघाले होते. दरम्यान अनसरवाडा पाटीजवळ निलंग्याकडून येत असलेल्या भरधाव कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने बालाजी यांच्या दुचाकीस जोराची धडक झाली. यात कारला अडकून दुचाकीसह ते जवळपास ५० ते ६० फुट फरफटत गेले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तर गहिनीनाथ व्यंकट गोबाडे व महादेव तात्याराव वाघमारे (रा. कलमुगळी) यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी नितीन उसनाळे यांनी निलंगा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









