तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
बार्शी तालुक्यातील वांगरवाडी या गावातील नऊ महिन्याच्या मुलाचा खून झाला होता. बार्शी तालुका पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता आईनेच ‘त्या’ बालकाचा वायरने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे.
त्यावेळी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार अश्विनी तुपे ही महिला घरात असताना एक अज्ञात इसम घरात शिरला आणि चोरीच्या उद्देशाने त्याने त्या महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावून घेतले. आणि तिथेच झोपलेला असलेला नऊ महिने वय असलेल्या सार्थक तुपे बालकाचा गळा आवळून खून केला होता.
बार्शी तालुका पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता आईने सार्थक जास्त रडत होता आणि किरकिर करत होता म्हणून खून केला असल्याची माहिती बार्शी पोलिस उपाधिक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बार्शी तालुका पोलीस ठाणेचे शिवाजी जायपत्रे उपस्थित होते. त्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून या बाबत अधिक तपास चालू आहे.









