तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
मुंबईमध्ये आमदार गोपीचंद पडळकर महाराष्ट्रातील दबलेल्या पिचलेल्या दुबळ्या घटकांचा प्रश्न घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धनगर वेशात व धनगर समाजाचा वाद्य ढोल घेऊन गेले होते. पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली व आडवले. पंढरपुरात बहुजन समाज बांधवांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौकात सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी माऊली हळणवर, प्रा सुभाष मस्के, रामभाऊ मिसाळ, संजय माने, अनिकेत मेटकरी, दादा कोळेकर, संतोष शेळके, हनुमंत मदने, चेतन हाके, आबा हाके, यांचेसह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की धनगर समाज आरक्षण व अनेक मागण्यांचे फलक घेऊन आमदार गोपीचंद पडळकर जात असताना अगोदर अनेक आमदार हे विविध वेशभूषा करून विधान भवनामध्ये गेलेले आहेत. त्यांना एक न्याय व आमदार गोपीचंद पडळकर यांना एक न्याय हे चुकीच आहे म्हणून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.









