तरुण भारत संवाद/सोलापूर
बीटकॉईन खरेदी करून दुप्पट फायदा मिळवून देतो असे म्हणून अमेरीका (यु़ एस)च्या डॅनियल स्मिथ ( पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) या इसमाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून सोलापुरातील अनिरुध्द शरद नाईक (वय ३०, रा़ इंदिरा नगर, विजापूर रोड) या तरूणाला साडेचार लाख रूपयांना गंडा घातला आहे़. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिरुध्द नाईक हे सोशल मिडीयावर ग्रूप पाहत असताना त्यांना एका अनोळखी ग्रूप मधून डॅनियल स्मिथ याच्याशी ओळख झाली़. स्मिथ याने चॅटिंग दरम्यान क्रिप्टोकरन्सीची माहिती देत बीटकॉईनच्या माध्यमातून दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आमिश दाखवले़ अनिरुध्दने त्याच्यावर विश्वास ठेवून ६ नोव्हेंबर २०११ रोजीपासून वेळोवेळी युपीआय व्दारे ४ लाख ५६ हजार ४३५ रुपये ट्रान्सफर केले़. त्यानंतर आरोपी स्मिथ याने फिर्यादीस कोणताही परतावा दिला नाही. यामुळे आपली आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़. या घटनेचा अधिक तपास पो.स.ई बेंबडे करीत आहेत़.
Previous Articleफायझर लस नव्या कोरोनालाही मारक
Next Article कर्नाटक : आता सरकारी सेवा थेट नागरिकांच्या दारी









